१०,००० पेक्षा जास्त लोकांना प्रशिक्षित करणारी संस्था

PKC AGRO कुटूंबात आपले स्वागत आहे.

पांडुरंग-कृषी या संस्थेच्या माध्यमातून आम्ही गेल्या ९ वर्षांपासून विविध कृषी व कृषी-पूरक व्यवसायांचे प्रशिक्षण देत असून हि संस्था या क्षेत्रातील आघाडीची संस्था आहे. शेळी-पालन,कुक्कुट-पालन,दुग्ध-व्यवसाय,डाळ-मिल,ऑईल-मिल,फळ व अण्ण प्रक्रिया-उद्योग या प्रकारच्या विविध क्षेत्रातील १०,००० पेक्षा जास्त शेतकरी, उद्योजक , नोकरदार याना संस्थेने आत्तापर्यंत प्रशिक्षित केले आहे. संस्थेच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या व्यवसायांसाठी लागणारे बँक-कर्ज व अनुदान प्रकल्प-अहवाल तयार केले जातात. या ऑनलाईन प्रशिक्षणाच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांना विविध कृषी-पूरक व्यवसायांची महिती व प्रशिक्षण देणार आहोत. भारतातील या प्रकारचा प्रयोग करणारी पहिलीच संस्था आहे.

शेतकऱ्यांनी आता वेगळ्या उद्योगांकडे वळायला हवे,केवळ पारंपरिक शेतीतून आर्थिक स्वातंत्र्य मिळवणे अशक्य आहे. सततचा दुष्काळ,नापिकी,नैसर्गिक आपत्ती,घसरणारे भाव यामुळे शेतकरी त्रस्त आहे. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना केवळ कृषी-पूरक व्यवसाय प्रशिक्षण देऊनच आम्ही थांबणार नाही, तर त्यांना उद्योजकीय कौशल्य आणि आपल्या शेतमालाची ऑनलाईन मार्केटिंग कशी करायची याविषयी देखोल आम्ही मार्गदर्शन करणार आहोत.
शेतकऱ्याला पिकवता येते मात्र विकत येत नाही असे म्हणतात,आणि या आधुनिक युगात मार्केटिंगच्या पद्धती बदलत आहेत, यामुळेच शेतकऱ्यांनी आता ऑनलाईन साक्षर होणे गरजेचे आहे. लाभदायक कुकुटपालन व्यवसाय परिचयाचा विषय आहे. ह्या व्यवसायाकडे आपण आता उद्योग म्हणून बघितलं पाहिजे. शेळीपालन शेळ्यांच्या जाती/आजार-उपचार, शेडचे बांधकाम, शासकीय योजना, बॅंक लोन करण्यासाठीची प्रक्रिया इ. गोष्टींचा समावेश होतो.
आम्ही शेतकरी व व्यावसायिक यांना योग्य मार्गदर्शन देऊन प्रकल्प अहवाल, अनुदान प्रक्रिया यात मदत करतो, कारण नुसता प्रकल्प उभारणे नव्हे तर तो यशस्वी पणे चालवणे यावर भर असतो. शेळीपालन शेळ्यांच्या जाती/आजार-उपचार, शेडचे बांधकाम, शासकीय योजना, बॅंक लोन करण्यासाठीची प्रक्रिया इ. गोष्टींचा समावेश होतो.
चांगल्या जातीच्या शेळ्या निवडून उत्पन्न कसे वाढवता येईल यासाठी संस्थेने प्रशिक्षण कार्यक्रमाचे नियोजन केले आहे. राज्य व केंद्र सरकारच्या 25 % ते 50 % अनुदानाच्या अनेक योजना शेळीपालन –व्यवसायामध्ये साठी आहेत, प्रशिक्षण प्रमाणपत्र यासाठी आवश्यक असते. याबरोबरच संस्थेद्वारे शेतकरी वर्गासाठी शेळी पालन, कुक्कुटपालन, स्पिरुलीना शेती, दाल मिल, ओइल मिल, नाबार्ड, एन. एच.बी., शेड नेट, पोली, हाउस, शेत तळे व याबरोबरच 50 पेक्षा जास्त योजनांचे संपूर्ण मार्गदर्शन केले जाते. तरी जास्तीत जास्त लोकांनी प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा .
 

शेळीपालन प्रशिक्षण या मध्ये आपण काय शिकणार ?

  • शेळीपालन व्यवसायाची ओळख ग्रामीण अर्थव्यवस्थेत शेळीपालनाचे महत्व
  • शेळ्यांच्या जाती शेळ्यांची खरेदी
  • शेळ्यांचे व्यवस्थापन शेळ्यांचा विमा शेळ्यांच्या आहाराचे नियोजन
  • प्रकल्पावरील कार्याचे नियोजन(प्रति-दिन आठवडा महिना) शेळ्या मेंढ्यांतील आजार लक्षणे लसीकरण व उपचार प्राथमिक उपचारासाठी वापराची औषधी
  • शेळ्यांच्या पैदासीचे नियोजन गाभण शेळ्यांची काळजी आणि करडांचे संगोपन
  • बंदिस्त शेळीपालन, प्रकल्प अहवाल व अर्थशास्र शेळीपालन कर्ज प्रकल्पसाठी लागणारी कागदपत्रे शेळी संगोपणातील आवश्यक नोंदी
  • यशस्वी शेळीपालनासाठी उद्योजकीय कौशल्य.
  • आपल्या कृषीमालाचे ऑनलाईन मार्केटिंग
  • शेळीपालन नोंदवही
  • नमुना प्रकल्प अहवाल

Customer Reviews

कोर्स संबंधी काही अडचण आल्यास आपण खाली क्र वर व्हॉट्सॲप करू शकता.