१०,००० पेक्षा जास्त लोकांना प्रशिक्षित करणारी संस्था.

PKC AGRO कुटूंबात आपले स्वागत आहे.

 

पांडुरंग-कृषी या संस्थेच्या माध्यमातून आम्ही गेल्या ९ वर्षांपासून विविध कृषी व कृषी-पूरक व्यवसायांचे प्रशिक्षण देत असून हि संस्था या क्षेत्रातील आघाडीची संस्था आहे. शेळी-पालन,कुक्कुट-पालन,दुग्ध-व्यवसाय,डाळ-मिल,ऑईल-मिल,फळ व अण्ण प्रक्रिया-उद्योग या प्रकारच्या विविध क्षेत्रातील १०,००० पेक्षा जास्त शेतकरी, उद्योजक , नोकरदार याना संस्थेने आत्तापर्यंत प्रशिक्षित केले आहे. संस्थेच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या व्यवसायांसाठी लागणारे बँक-कर्ज व अनुदान प्रकल्प-अहवाल तयार केले जातात. या ऑनलाईन प्रशिक्षणाच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांना विविध कृषी-पूरक व्यवसायांची महिती व प्रशिक्षण देणार आहोत. भारतातील या प्रकारचा प्रयोग करणारी पहिलीच संस्था आहे.

शेतकऱ्यांनी आता वेगळ्या उद्योगांकडे वळायला हवे,केवळ पारंपरिक शेतीतून आर्थिक स्वातंत्र्य मिळवणे अशक्य आहे. सततचा दुष्काळ,नापिकी,नैसर्गिक आपत्ती,घसरणारे भाव यामुळे शेतकरी त्रस्त आहे. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना केवळ कृषी-पूरक व्यवसाय प्रशिक्षण देऊनच आम्ही थांबणार नाही, तर त्यांना उद्योजकीय कौशल्य आणि आपल्या शेतमालाची ऑनलाईन मार्केटिंग कशी करायची याविषयी देखोल आम्ही मार्गदर्शन करणार आहोत.

शेतकऱ्याला पिकवता येते मात्र विकत येत नाही असे म्हणतात,आणि या आधुनिक युगात मार्केटिंगच्या पद्धती बदलत आहेत, यामुळेच शेतकऱ्यांनी आता ऑनलाईन साक्षर होणे गरजेचे आहे. लाभदायक कुकुटपालन व्यवसाय परिचयाचा विषय आहे. ह्या व्यवसायाकडे आपण आता उद्योग म्हणून बघितलं पाहिजे. कुकुटपालन व्यवसाय करतांना योग्य जातीची निवड व त्यांचे रोगमुक्त संगोपन या महत्वाच्या बाबी असतात. व्यावसायिक नियोजन केल्यास अगदी लाखो रुपयांची उलाढाल या व्यवसायात होवू शकते.

कोंबडी पालनाच्या व्यवसायात बेकारी निर्मूलनाची क्षमता व मानवी पोषक आहार पुरविण्याचे सामर्थ्य असल्याने कुक्कुटपालनाचा व्यवसाय वरदान ठरू शकतो. दिवसेंदिवस शहरातील जनतेला कोंबडीची अंडी व मांस यांची मागणी सतत वाढत असल्याने या व्यवसायाला मालाच्या विक्रीची हमी मिळते. कुक्कुटपालन व्यवसाय आता केवळ खेड्यातील शेतीचा पूरक उत्पन्नाचा जोडधंदा आहे.

या व्यवसायात मागणीनुसार उत्पादन वाढवता येते.या व्यवसायामुळे लोकांनाप्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे रोजगार व नोकरीची संधी उपलब्ध होऊ लागली आहे. अधिक उत्पादन देणारे सुधारित पक्षी, रोग प्रतिकारक लसी, औषधे, नवीन तंत्रज्ञान, आधुनिक व्यवस्थापन पद्धती व उत्पादित मालाच्या विक्रीची हमी वगैरे हा व्यवसाय सुसंघटित व सुस्थिर पायावर उभा राहू शकतो.देशी कोंबड्यांचे तसेच सुधारित जातीचे उत्पादन वाढविण्यासाठी दरवर्षी शासकीय स्तरावर योजनेअंतर्गत पिले व पक्षी अल्पभूधारकांना पुरविली जातात.

कोंबडी पालनाच्या व्यवसायात बेकारी निर्मूलनाची क्षमता व मानवी पोषक आहार पुरविण्याचे सामर्थ्य असल्याने कुक्कुटपालनाचा व्यवसाय वरदान ठरू शकतो. शेतीला हा व्यवसाय एक उत्तम पूरक व्यवसाय आहे.दिवसेंदिवस शहरातील जनतेला कोंबडीची अंडी व मांस यांची मागणी सतत वाढत असल्याने या व्यवसायालामालाच्या विक्रीची हमी मिळते. सरकार व बँका यांनीदेखील या व्यवसायात अधिकाधिक प्रमाणात कर्ज देण्यास सुरुवात केली आहे.या व्यवसायात निव्वळ २५ टक्के फायदा होतो.

कुकुटपालन प्रशिक्षण या मध्ये आपण काय शिकणार ?

  • प्रस्तावना कुकुटपालन व्यवसायची ओळख
  • ग्रामीण भागात कुकूट पालनाचे महत्व. कोंबड्याची शरीर रचना जाती व जाती नुसार वैशिष्ट.
  • कोंबडी पालनाच्या पद्धती व घराचे प्रकार.. कोंबड्याचे संगोपन व संगोपनचे ( साहित्य खड्याची पाण्याची भांडी)
  • कोंबड्याचे खाद्य अंड्यावरील मांसल पक्षी व गावरान पक्षी घरगुती खाद्य तयार करणे लसीकरण अंड्यावरील पक्षी व मांसल पक्षी
  • शेडची स्वछता निर्जंतुकीकरण पद्धती, कोंबड्याचे आजार व प्रतिबंधक उपाय.
  • मांसल कोंबडी उत्पन्न व खर्च गावरान पक्षी सांगोपन कडकनाथ मार्केटिंग कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग ( कंत्राटी पद्धत )
  • कुकुटपालन बँक कर्ज प्रकरण व लागणारी कागद पत्रे
  • आपल्या कृषिमालाची आँनलाईन मार्केटिंग.
  • कुकुटपालन नोट्स व प्रकल्प अहवाल

Customer Reviews

कोर्स संबंधी काही अडचण आल्यास आपण खाली क्र वर व्हॉट्सॲप करू शकता.

FACEBOOK DISCLAIMER

This website is not part of the Facebook website or Facebook Inc. Additionally, this site is not endorsed by Facebook in any way. Facebook is a trademark of Facebook, Inc.

GOOGLE DISCLAIMER

This website is not part of the Google website or Facebook Inc. Additionally, this site is not endorsed by Google in any way. Google is a trademark of Google, LLC.